आज जागतिक महिला दिन व माझा वाढदिवसही. या भारत देशात कर्तृत्ववान अनेक महिला होवून गेल्या.जाज्वल्य देशाभिमान व काहीतरी चांगले करण्याची प्रवृत्ती यामुळे महिलांनी देशाची मान उंचावली. सद्सद्विवेक बुद्धीने वागून जगात वावरणाऱ्या स्त्रिया सुख व समाधान मिळवतात. अविचारी वागून बुद्धी नाश होतो व सर्व जीवन दुखमय होते. स्त्रीने संसार टिकवण्यासाठी कितीही खटपट केली तरी पुरुषांनी तो प्रामाणिक राहून टिकवायचा असतो.
सर्वच गोष्टी स्त्रियांच्या हातात नसतात. प्रामाणिक स्त्रीचा गैरफायदा घेणारे जसे पुरुष असतात तशा स्त्रियाही असतात. त्या सर्वांपासून सावध राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करणे एवढेच स्त्रीच्या हातात असते. परस्त्रीवर नजर ठेवून स्वतःच्या स्त्रीचा दुस्वास करून अनेकांनी आपले स्वताचे संसार उध्वस्त केले आहेत व स्वतःच्या पत्नीला वाऱ्यावर सोडले आहे. अशा स्त्रियांनी न डगमगता आपले आयुष्य काळजीपूर्वक पावले टाकून जगणे फार महत्वाचे आहे. हार न मानता स्वतःची चूक नसतांना कच खाण्याचे काहीएक कारण नाही. संयम, आत्मविश्वास व योग्य ती काळजी घेवून प्रसंगी धाडस दाखवून जगणे सोपे जाते. वेळोवेळी आई वडिलांचा योग्य सल्ला घेवून जीवनाची मार्गक्रमणा करावी. योग्य शिक्षण, मार्गदर्शन व योग्य विचाराने जगन्मान्य असे वागले तर दुखी जीवन होण्याचे काहीएक कारण नाही. घराण्याची, देशाची मान उंच राहील असेच सर्व स्त्रियांनी वागावे.
विवेकाने वागले तरच हे शक्य आहे. सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
श्रीनिवास गोसावी ०८.००३.२०१३
No comments:
Post a Comment