हा समर्थ रामदास स्वामींचा श्लोक एका अर्थाने खरोखरोच सत्य व पटणारा आहे.
मनुष्य जन्माला येवून पुढे जे जे पाहतो,अनुभवतो व उपभोगतो त्यावरून खोल विचार केला तर कळून येते कि जगात सर्व सुखी असा कोणीच
नाही.पैशाने श्रीमंत माणूसहि सुखी असेलच असे नाही.
त्याचेमागे काहीतरी व्याधी लागलेली असतेच किंवा पैशामुळे होणारे वाद,मत्सर,कुरघोडी व आपल्याच मुलांची चाललेली उधळपट्टी व त्याबरोबर त्यांना लागलेली व्यसने व वाईट सवयी यांनी तो दुखी असतोच. गरिबाला पैशाची व जगण्याची काळजी असते. खोल विचार केला तर प्रकर्षाने पदोपदी जाणवते कि या सर्व गोष्टीचे कारण प्रेम व माया असून त्याचा त्याला कधीच अंत राहत नाही. लोभ व माया माणसाला त्यातच गुरफटून टाकते.
लहानपणी आई वडलांची निरागस माया व प्रेम माणसाला सुखावते.त्यावेळी अज्ञानातच सुख असते म्हणूनच म्हटले आहे कि “ लहानपण देगा देवा.... “
मनुष्य जसा मोठा होवू लागतो तसे जगाचे आकर्षण व कुतूहल यामुळे प्रेमाची व्याप्ती वाढते व त्यात बरे वाईट अनुभव यायला सुरवात होते.कारण ते प्रेम अनेक ठिकाणी वाटले जाते व प्रत्त्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतच नाहीत.ऐन जवानीत योग्य साथ, मार्गदर्शन मिळाले तर, व आई वडिलांची व वडीलधाऱ्यांची आज्ञा घेवून पुढे गेले तर बरेच जणांचे आयुष्य सुखी होऊ शकते.ज्यावेळी शिक्षण घ्यायचे आहे त्यावेळी शिक्षण वेळेवर व चिकाटीने घेवून पूर्ण करणे व नंतर अर्थार्जन करून मनासारखी नोकरी किंवा व्यवसाय सुरु झालेवर आई वडिलांच्या विचाराने योग्य साथीदाराची निवड करून गृहस्थाश्रम स्वीकारणे असा क्रम बरेच जण पाळत नाहीत, त्यातून प्रेमभंग, अपेक्षाभंग किंवा चुकीची निवड, पश्चाताप, मानसिक हानी, शारीरिक हानी व आर्थिक नुकसान व दुखी जीवन वाट्याला येते. कारण नसतांना मनस्ताप होतो.
सुखी जीवनात अतिलोभ, द्वेष,मत्सर, वासना यांचा हव्यासापोटी व अहंकारापोटी शिरकाव झाला तर जीवन दुखःमय होण्यास वेळ लागत नाही.
दुसरयाचे ऐकुन घेणे,सर्वसमभाव ठेवून आवश्यक असेल तरच मत व्यक्त करणे, विनाकारण विरोध न करणे, दुसऱ्याला कमी न लेखणे, आत्मविश्वास,योग्य वागणूक, अहंकाराला थारा न देणे व मी करीन ते पूर्व असे न वागणे या गोष्टीने जीवन सुखी होण्यास मदत होते. अति लोभापायी मनुष्य त्यात गुंतून दुखी होतो.या सर्व गोष्टींना योग्य दिशा देण्याचे काम फक्त मनच करते. म्हणून मनाने योग्य दिशा घेवून वागले तर मनुष्य सुखी होतो. सर्वे सुखे असून सुद्धा मनुष्याचे मन शांत नसेल तर मनुष्य हा दुखीच राहतो.
लेखक श्रीनिवास ज. गोसावी.B.com.LLM.,CAIIB,MBA(Banking & Finance)